शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

यवतमाळमध्ये भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा खून; दोघांना घेतले ताब्यात

By विलास गावंडे | Published: September 15, 2024 11:03 PM

आर्णी येथील घटना; शेळी बांधण्यावरून झाला होता वाद

आर्णी (यवतमाळ): घराच्या भिंतीवर डोके आपटून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास येथील दाभडी रोडवरील संभाजीनगरात घडली. बादल केशव टाले (२१, रा. संभाजीनगर, आर्णी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बादल टाले व घराजवळच राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये शेळी बांधण्यावरून दुपारी वाद झाला होता. रात्री संभाजीनगरातील गणेश मंडळाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यातील वाद उफाळून आला. बादल याला दोघांनी घराजवळ असलेल्या बोळीत नेले. त्या ठिकाणी त्याचे एकाने भिंतीवर वारंवार डोके आपटले तर, दुसऱ्याने मारहाण केली. या प्रकारात गंभीर होऊन बादल याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती होताच आर्णी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आकाश दोडफोडे व कन्हैया वाघमारे (रा. संभाजीनगर, आर्णी) या तरुणांना ताब्यात घेतले. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू