शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी निलंबित पोलिसाने उकळले २२ लाख

By मनीषा म्हात्रे | Published: June 19, 2023 12:28 PM

डोंगरीतील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा कारखाना आहे.

मुंबई : ड्रग्जच्या गुन्ह्यातून भावाचे नाव कमी करण्याचे आमिष दाखवून आणि कुटुंबाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका निलंबित पोलिसाने एका व्यावसायिकाकडून २२ लाख उकळल्याची घटना डोंगरीत समोर आली आहे. या प्रकरणी निलंबित पोलिसासह एका खबऱ्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या वर्दीला डाग लावणाऱ्या अशा घटनांमुळे गेल्या काही काळापासून मुंबई पोलिस दलाची बदनामी होत आहे.

डोंगरीतील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची नावेद सलीम परमार ऊर्फ पाव याच्यासोबत ओळख झाली. पोलिस खबरी म्हणून काम करत असल्याचे सांगून, कामे असल्यास सांगण्यास सांगितले. 

मार्चमध्ये नावेद घरी आला. तक्रारदार यांचा मोठा भाऊ आसीफ कासम राजकोटवाला याचे नाव अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आहे. युनिटमध्ये त्याच्या ओळखीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गवारे असून त्यांना सांगून, भावाचे नाव गुन्ह्यातून काढू शकतो, असे सांगितले. 

त्यांनी दुर्लक्ष करताच, भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर त्यात  अन्य लोकांनाही अडकविण्याची भीती घातली. 

ठरल्याप्रमाणे ते गवारे याच्या युनिटमध्ये भेटण्यासाठी गेले. मात्र गवारेने युनिटमध्ये न भेटता तेथीलच हॉटेलमध्ये भेटले. तक्रारदार यांनी त्याला ओळखपत्र विचारताच तो चिडून काम करणार नाही असा ओरडला. नंतर त्याने लांबूनच पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवले. 

दोघांनी भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी ३५ लाख आणि दोन ॲपल फोनची मागणी केली. तक्रारदार यांनी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगताच, त्याने घरच्यांना त्याच गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवत, भावाला १० वर्षाची शिक्षा होईल असे सांगितले. 

चर्चेअंती गवारेने २२ लाखांत काम होणार असल्याचा निरोप तक्रारदारांना दिला. ठरल्याप्रमाणे मार्च अखेरीस ११ लाख दिले. काही दिवसांनी गवारे दोन पानांचा पेपर घेऊन भावाचे नाव काढून टाकल्याचे सांगत, पेपरची एक कॉपी सही करून दिली. त्यानंतर, उर्वरित ११ लाख, आयफोन त्याला दिला.

२ जून - जीएसटी प्रकरणासाठी एक कोटी उकळलेजीएसटी प्रकरणातून सुटका करण्यासाठी पोलिसाने कस्टम अधिकाऱ्यांच्या मदतीने व्यावसायिकाची एक कोटीची फसवणूक केली. रेल्वे पोलिस जयेश कदमसह दोन कस्टम अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद असून पुढील तपास आग्रीपाडा पोलिस करीत आहेत.  

आधी गुन्हे नंतर निलंबित अधिकाऱ्यांची घरवापसीमविआ सरकारच्या काळात गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्यास सुरुवात झाली. अंगडिया वसुली प्रकरणातील पोलिस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम, समाधान जमदाडे यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले. 

  वसुली प्रकरणात निलंबित केलेले पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनाही गुन्हे शाखेने क्लीन चिट देत, त्यांचेही निलंबन मागे घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.   बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांना धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी  पोलिस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांना पुन्हा सेवेत घेतले.

पेपर कॉपीमुळे संशय महिनाभराने गवारेने दिलेल्या पेपरवर स्टॅम्प नसल्याने त्यांनी वकिलांना तो पेपर दाखविला. वकिलांनी तो  कोर्टाकडून साक्षांकित करून घेण्यास सांगितला. त्यांनी नावेदकडे याबाबत सांगताच, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. १८ एप्रिल रोजी गवारेने त्यांना भेटून पेपर देण्यास सांगितले. मात्र, पेपर मिळाला नाही. अखेर १ मेपर्यंत पेपर न दिल्यास पैसे परत देण्याबाबत सांगितले. त्यानंतर, गाडीत पेट्रोल भरायचे सांगून क्रेडिट कार्ड घेऊन निघून गेला. त्यानंतर, कॉलही बंद लागला.

गवारेही नॉट रिचेबल   व्यावसायिकाने गवारेशी बोलणे करताच, त्यांच्याकडून काम होणार नाही. ३ मे रोजी १५ लाख परत देतील असे सांगितले.   ७ मे रोजी नावेदचा मोबाइलही बंद लागला. गवारे यांना कॉल केला असता तो बंद लागला.   यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

बडतर्फ अन् ठग...गवारे हा बडतर्फ पोलिस असून तो लोकांना पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक करत असल्याचे समोर आले. तसेच नावेद याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी