शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

सीबीआय कारवाईच्या नावाखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्याला २.३२ कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Published: July 19, 2024 11:26 PM

स्काईपच्या माध्यमातून २४ तास ठेवले डिजिटल कैदेत : विदेशात रक्कम व महिलांचे अवयव पाठविल्याचा लावला होता आरोप

नागपूर : सीबीआयच्या कारवाईचा धाक दाखवून राजस्थानमधील एका टोळीने एका मल्टिनॅशनल कंपनीतील तरुण उच्चपदस्थ अधिकाऱ्याला २.३२ कोटींचा गंडा घातला. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपींचा शोध लावला असून एका आरोपीला अटकदेखील करण्यात आली आहे. आरोपींनी स्काईपच्या माध्यमातून अधिकाऱ्याला २४ तास अक्षरश: डिजिटल कैदेत ठेवले होते.आशय अविनाश पल्लीवार (२४, लक्ष्मीनगर, वेस्ट हायकोर्ट मार्ग) असे तक्रारदाराचे नाव आहे. आशय ॲमेझॉन कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरीला आहेत. २१ एप्रिल रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. समोरील व्यक्तीने तो सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासविले. तुमची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.

तुम्ही भारतातून विदेशात महिलांचे अवयव पाठविले व विदेशात रक्कम पाठविल्याचे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे कारवाई होईल, अशी भिती समोरील व्यक्तीने दाखविली. त्याने त्यानंतर आशय यांना अनेकदा फोन केले. चौकशीदरम्यान बॅंक खात्यातील संपूर्ण रक्कम, घरातील सर्व दागिने, आईवडिलांकडे असलेली रक्कम, दागिने, बॅंकेतील मुद्देमाल सर्व सीबीआयडे सोपवावे लागतील अशी बतावणी आरोपीने केली. त्यानंतर तीन जण सीबीआयचे अधिकारी बनून नागपुरातील हॉटेल कन्हैय्या व हॉटेल रेणुका इन येथे गेले व तेथे आशयची भेट घेतली. त्यांनी सीबीआयशी निगडीत बोगस कागदपत्रे दाखवून कठोर कारवाई होईल अशी भिती दाखविली.

या प्रकाराने आशय दडपणात आले होते. त्यांनी आरोपींना १८० तोळे दागिने, एक किलो चांदी, रोख ६७ लाख रुपये दिले. तसेच बॅंकेद्वारे ५७.२० लाख रुपये पाठविले. आरोपींनी आशयकडून २.३२ कोटींचा मुद्देमाल घेतला. कारवाई पूर्ण झाल्यावर रक्कम पूर्ण मिळेल असे आरोपींनी म्हटले होते. मात्र त्यानंतर त्यांनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशय यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३८४, ४१९, ४२०, ४६५, ४७०, ४७१, ५०६, १७०, १२०(ब) तसेच सहकलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

- तांत्रिक तपास, मनी ट्रेलमधून गवसले आरोपीगुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तांत्रिक तपास, मनी ट्रेल तसेच कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे यात ) सुमेरसिंह जगमलसिंह (४५, खिरजा, जोधपूर, राजस्थान), प्रकाश मेघनानी (जवाहर पार्क, जयपूर, राजस्थान) व दलपतसिंह धसिंह (२२, धोकलसर,पोस्ट सेखाला, जोधपूर, राजस्थान) यांचा समावेश असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे सुमेरसिंहला मुंबईतून ताब्यात घेतले. त्याने इतर दोन आरोपींसोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. महिला पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, गजानन चांभारे, संदीप चंगोले, दिनेश डवरे, शैलेश जांभुळकर, गजानन कुबडे, सुरेश तेलेवार, कमलेश गणेर, सुनिल कुंवर, संदीप पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- २४ बॅंक खाती गोठविलीआरोपींनी आशयकडून आलेली रक्कम देशातील २४ बॅंक खात्यात जमा केली किंवा वळविली होती. पोलिसांनी मनी ट्रेलच्या माध्यमातून या खात्यांचा शोध लावला. संबंधित बॅंक खाती कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून गोठविण्यात आली आहेत.

- खरे सीबीआय अधिकारी असल्याचा बनावआशयला संपर्क केल्यानंतर समोरील व्यक्तीने तो सीबीआयचा खरा अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी विविध प्रकार केले. त्याने कायदेशीर भाषेचा वापर केला. तसेच आशय यांना स्काईप या ॲपचा कॅमेरा सतत सुरू ठेवण्यास सांगून २४ तास अक्षरश: डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले होते. काहीच चूक नसतानादेखील सीबीआयकडून आणखी कठोर कारवाई होऊ शकते या भितीपोटी आशय जाळ्यात अडकत गेल्याने आरोपींचे फावले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी