चंडीगड - पंजाब पोलिसांनी लुधियानामधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड घातली आहे. या रेव्ह पार्टीमधून धिंगाणा घालणाऱ्या सात तरुणींसह २५ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्याचं सेवन केलं जात होतं. तर हॉटेलकडे बारचं लायसन्सही नव्हतं. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार शहरातील व्यावसायिकांनी महाराष्ट्र आणि दिल्लीतून तरुणी मागवल्या होत्या. ते हॉटेलमधील बॅक्वेट हॉलमध्ये अश्लील गाण्यांवर स्ट्रीप डान्स करत होते. दरम्यान, या रेव्ह पार्टीची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली आणि संबंधितांच्या मुसक्या आवळल्या.
या तरुणी, महिला आणि व्यावसायिकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच हॉटेल मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यावसायिकांनी रेव्ह पार्टीसाठी शहराबाहेरून तरुणी बोलावल्याची गोपनीय माहिती पोलिसांन मिलाली होती. यामधील पाच तरुणी ह्या दिल्लीतील तर दोन तरुणांनी हरयाणा आणि मुंबईतून बोलावण्यात आले होते. या रेव्ह पार्टीमध्ये बाहेरील राज्यातील व्यावसायिकही सहभागी झाले होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये लुधियानाबरोबरच अमृतसर, पाटणा, अलाहाबाद आणि दिल्लीतील व्यावसायिकांचा समावेश आहे.
सूत्रांनी सांगितले की, जेव्हा पोलिसांची टीम हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा हे व्यावसायिक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होते. तसेच तरुणींसोबत अश्लील नृत्य करत होते. पोलीस तिथे पोहोचताच एकच गोंधळ उडाला. तसेच ही मंडळी लपण्यासाठी आडोसा शोधू लागली. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.
या रेव्ह पार्टीचा उलगडा होताच अनेक प्रतिष्ठितांना हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तोपर्यंत कारवाई केली होती. तसेच संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन आले. मात्र त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.