उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बस्तीमध्ये (Basti Suicide Case) प्रेमात दगा मिळालेल्या एका 26 वर्षीय तरूणाने वडिलांच्या लायसन्स रिवॉल्वरने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्याआधी तरूणाने 4 मिनिटांचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता. व्हिडीओतमध्ये तरूणाने सांगितलं की, त्यांचं दुसऱ्या समाजाच्या तरूणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पण ती नेहमीच त्याचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करत होती. अशात तिचं दुसऱ्या तरूणासोबत अफेअर सुरू झालं. आता दोघेही त्याला मारण्याचा प्लान करत आहेत. त्यामुळे तो स्वत:च आत्महत्या करत आहे.
ही घटना आरजानीपूर गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षाय सुनील कुमार मौर्यच्या वडिलांचं बाजारात ऑटो पार्ट्सचं दुकान आहे. सुनील इथे वडिलांना मदत करतो. सोमवारी दुपारी 12 वाजता तो दुकानातून आरजानीपूर गावात काही कामासाठी आला होता. त्याने वडिलांना सांगितलं की, तो गोदाममध्ये जात आहे. पण जेव्हा तो परत आला नाही तर त्याच्या वडिलांनी दुकानात काम करणाऱ्या तरूणाला गोदामात पाठवलं.
तरूणाने अनेक वेळा गोदामचा दरवाजा वाजवला. पण सुनीलने दरवाजा उघडला नाही. तरूणाने याची सूचना त्याच्या वडिलांना दिली. ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना सुनीलचा मृतदेह आढळून आला. त्याने डोक्यावर गोळी झाडली होती. सोबतच बाजूला रिवॉल्वरही पडली होती.
लगेच याची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. घटनेची चौकशी सुरू केली तेव्हा त्याची फेसबुक पोस्ट आढळून आली. त्याने दुसऱ्या समाजाच्या तरूणीला आत्महत्येसाठी भाग पाडण्यासाठी जबाबदार धरलं आहे.
सुनील व्हिडीओत म्हणाला की, "मी जे काही करत आहे ते माझ्या मर्जीने करत आहे. माझं गेल्या 10 वर्षांपासून एका दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत अफेअर होतं. मी तिला शिकवलं आणि तिच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या. तिने लग्नाच्या आणि प्रेमाच्या नावावर माझं शोषण केलं. दरम्यान तिचं नोएडाच्या एका तरूणासोबत अफेअर सुरू झालं. मग ती मला इग्नोर करू लागली. तिने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. ती म्हणाली की, तू हिंदू आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आता ती आणि तिचा मला मारण्याचा प्लान करत आहेत. मी आज नाही तर उद्या मारला जाणार. त्यामुळे मी स्वत:च माझं जीवन संपवत आहे".
पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. सोबतच प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. ज्या तरूणीचा तरूणाने उल्लेख केला तिचीही चौकशी केली जाणार.