शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

२६४ कोटींचे बनावट रिफंड, माजी आयकर अधिकारी ईडीच्या जाळ्यात; अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 8:04 AM

मुंबईत कारवाई, तिघांना दहा दिवसांची कोठडी

मुंबई : तब्बल २६३ कोटी रुपयांच्या बोगस आयकर रिफंड क्लेम प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत कार्यरत असलेला माजी आयकर निरीक्षक व त्याच्या दोन मित्रांना शुक्रवारी अटक केली. या तिघांविरोधात जानेवारी २०२२ मध्ये ‘सीबीआय’नेही गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तिघांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारत मनी लाँड्रिंग केल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे. या तिघांनाही १० दिवसांची ईडी कोठडी सुनाविण्यात आली आहे. 

तानाजी अधिकारी असे या माजी अधिकाऱ्याचे नाव असून तो मुंबईत आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होता, त्यावेळी रिफंड क्लेम जारी करण्याचे काम त्याच्याकडे होते. याकरिता त्याच्या वरिष्ठांच्या संगणकाचा लॉगिन आयडी व पासवर्डही त्याच्याकडे होता. त्याद्वारे तो रिफंड जारी करीत होता. त्याने विविध क्लेम जारी करीत ते पैसे त्याचा मित्र भूषण पाटील आणि राजेश शेट्टी यांच्या कंपनीत जमा केले. नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या एका वर्षाच्या काळात रिफंडच्या एकूण १२ प्रकरणांद्वारे त्याने तब्बल २६४ कोटी रुपये या कंपनीमध्ये वळविले.

सरकारी तिजोरीतून एकाच बँक खात्यात एवढी मोठी रक्कम आल्याचे संबंधित बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर बँकेने त्या खात्याची पडताळणी सुरू करीत त्याची माहिती आयकर विभागाला दिली. याप्रकरणी आयकर विभागाच्या आयुक्तांनी सर्वप्रथम ‘सीबीआय’मध्ये तक्रार दाखल केली मात्र मनी लाँड्रिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला. ईडीने जानेवारीपासून आतापर्यंत या तिघांचे कर्जत, खंडाळा, लोणावळा, पुणे, उडुपी येथील भूखंड आणि पनवेल, मुंबई येथील फ्लॅट्स, तसेच बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी अशा तीन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. त्याची किंमत ३० कोटी रुपये आहे. याखेरीज बँक खात्यातील रक्कम अशी ११६ कोटी रुपयांची जप्ती झाली आहे. 

अभिनेत्री कीर्ती वर्माही सहभागीएकेकाळी जीएसटी विभागात अधिकारी असलेली आणि आता अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कीर्ती वर्मा हिचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. या प्रकरणात आयकर अधिकाऱ्याचा मित्र असलेल्या भूषण पाटील याची ती मैत्रीण आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांद्वारे तिने गुरगाव येथे एक मालमत्ता १ कोटी २ लाख रुपयांना खरेदी केली होती. एकाच वर्षात तिने ती मालमत्ता १ कोटी १८ लाख रुपयांना विकली. याचे व्यवहारही ईडीच्या रडारवर आल्यानंतर तिच्या बँक खात्यातील ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स