पथामामथिट्टा (केरळ) - केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मातेने तिच्या २७ दिवसांच्या बाळाचे डोके भिंतीवर आपटूत त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या आरोपानंतर आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, वेळेपूर्वीच जन्मलेला हा मुलगा आजारी पडत असल्याने सातत्याने रडत असे. त्यामुळे त्रस्त होऊन आईने हे टोकाचे पाऊल उचलले.
ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. बाळाला त्याच दिवशी दुपारी ११ वाजता रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगिलले की, डॉक्टरांनी तपास केल्यानंतर मुलाला परत घरी आणण्यात आले. मात्र त्यानंतर मुलाची तब्येत अधिकच बिघडली. त्यानंतर या बाळाला तालुक्यामधील एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्या बाळाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर एक आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांच्या एका वक्तव्याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला या आश्रमातील स्वयंपाकघरात काम करते, तसेच ती तिच्या ४५ वर्षीय प्रियकरासोबत राहते. बाळाचे पोस्टमार्टेम झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, मुलाच्या डोक्यावर जखमांची खूण आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मुलांच्या आई-वडिलांची चौकशी केली.
तेव्हा पोलिसांना समजले की, महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये फोनवरून संपर्क झाला होता. त्यांनी आश्रमात एकत्र राहण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, या बाळाचे वडील आधीपासून विवाहित होते, तसेच याची माहिती या महिलेलाही होती. त्यानंतर महिलेने स्वत:च तिच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.