शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पुण्यात दिवसाढवळ्या चोरट्यांनी मारला '' स्टेट बँक ऑफ इंडिया '' वर डल्ला ; २८ लाखांची रोकड लुटली 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 5:09 PM

पुण्यातल्या स्वारगेट जवळील सेव्हन लव्ह चौकात चोरट्यांनी भरदिवसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर डल्ला मारला.

ठळक मुद्देकर्मचारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करत चोरट्यांनी साधला डाव

पुणेपुणे: शहरातील सेव्हन लव्हज चौकात असणा-या स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेतून भरदिवसा २८ लाखांची चोरी झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट व खळबळ उडाली आहे.  एका चोरट्यांच्या टोळीने बँक कर्मचा-यांची नजर चुकवून कॅशिअरच्या मागे  ठेवलेली पैशांची पेटीच उचलून नेली.  तपासाकरिता स्थानिक पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर धाडण्यात आली आहेत.  चोरी करणारी टोळी बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपींनी पेटीतील पैसे काढून घेऊन ती टिळक रस्त्यावर टाकून दिल्याची माहिती मिळाली आहे.याप्रकरणी बँकेच्यावतीने वर्तिका प्रांशु श्रीवास्तव (35,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार अनोळखी व्यक्तीविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चोरीची घटना घडली. स्टेट बँकेच्या शाखेत सात ते आठ व्यक्ती एका मागोमाग शिरल्या. त्यांनी कॅशीयरसह इतर काऊंटरवरील व्यक्तिंना बोलण्यात गुंतवून ठेवले. यानंतर कॅशीयरच्या मागे पैशांनी भरलेली पेटी उचलून एक व्यक्ती बाहेर पडला. यानंतर त्याचे इतर साथीदारही एका मागोमाग बँकेतून निघून गेले. अन्य व्यक्तिंना पैसे देण्यासाठी कॅशीयर मागे वळल्यानंतर रोकड असलेली पेटी जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या पेटीमध्ये तब्बल 28 लाख रुपये असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, उमाजी राठोड आदींनी भेट दिली. ............ एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेतून रक्कम चोरीला गेल्याचे कळताच तातडीने आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.  अज्ञात सात ते आठ व्यक्तींनी बँकेतील कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून ही चोरी केली आहे. प्रशासनाला या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून चोरांनी थोड्याच अंतरावर पैसे काढून रिकामी पेटी टाकून दिल्याचेही आढळले आहे.- शिरीष देशपांडे, उपायुक्त, गुन्हे शाखा ............................ चोरीस गेलेल्या नोटांचा तपशील  2000 दराच्या 486 नोटा, 500 दराच्या  नोटा, 200 दराच्या 531 नोटा, 100 दराच्या 1,666 नोटा, 1000 रुपयांची लोखंडी पेटी असा 28 लाख 9 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीThiefचोरPoliceपोलिसSBIएसबीआय