मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठी कारवाई करत आंध्रप्रदेशमधून तस्करी करून आणलेला तब्बल २८६ किलोचा उच्च प्रतीचा गांजा जप्त केला आहे. हा २८६ किलोंचा गांजा एकूण ९५ पाकिटांमध्ये भरून कारमध्ये लपविण्यात आला होता. याप्रकरणी एनसीबीने दोघांना बेड्या ठोकून गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडीही जप्त केली आहे.एनसीबीच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २६ जूनच्या पहाटे सोलापूर-मुंबई महामार्गावर सापळा रचला. दोन रात्री हायवेवरच काढून एनसीबीने संशयित वाहनाला अडवून त्याची तपासणी केली. यामध्ये कारच्या वेगवेगळ्या भागात गांजाने भरलेली ९५ पाकिटे सापडली. आंध्रप्रदेशमधील तेलंगणा येथून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. अखेर एनसीबीने गांजाची ९५ पाकिटे आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशातून तस्करी करून आणलेला २८६ किलो गांजा जप्त, केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:53 PM