मुंबई : सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने मुंबई विमानतळावर केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत २.९ किलो सोने जप्त केले. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.शारजहाहून एक प्रवासी मुंबईत सोने घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शारजहावरून आलेल्या एका सुदानी प्रवाशाच्या संशयास्पद हालचाली हेरून त्याला रोखण्यात आले. त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली असता, १.८ किलो सोन्याची पेस्ट आढळून आली. त्याचे बाजारमूल्य ७५.५ लाख रुपये आहे. शिवाय त्याच्याकडील साहित्याच्या ट्रॉलीमधून ५ लाख रुपये किमतीचा अन्य ऐवज जप्त करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांच्या नजरेस पडू नये, अशाप्रकारे त्याने या वस्तू लपवून ठेवल्या होत्या. याप्रकरणी त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून १.१ किलो सोन्याची भुकटी जप्त केली. त्याने ती अंतर्वस्त्रात लपवून आणली होती. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला अटक केली आहे.
मुंबई विमानतळावर दोन वेगवेगळ्या कारवायांत २.९ किलो सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 7:47 AM