नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका अफगाणी व्यक्तीस कस्टम विभागाने अटक केली आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी ही कस्टम विभागाने कारवाई केली आहे. दिल्लीविमानतळावरून एक अफगानी नागरिकाने बुटांमध्ये २ किलो सोन्याची बिस्किटं लपवून आणली होती. दरम्यान याबाबत कस्टम विभागाने या अफगानी व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या अंगझडतीत बुटाच्या सोलमध्ये ७३ लाख किंमतीची दोन सोन्याची बिस्किटं आढळून आली. ही कारवाई कस्टमने १० सप्टेंबर रोजी केली असून कस्टमला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वरून काबुलहून आलेल्या अफगानी नागरिकास कस्टमने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत संशय दिसून आल्याने त्याची अंगझडती केली असता काळ्या रंगाच्या चामड्याच्या बुटांमध्ये १ - १ किलोची दोन सोन्याची बिस्किटं सापडली. सोनं तस्करी केल्याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.