शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
5
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
6
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
7
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
8
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
9
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
10
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
11
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
12
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
13
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

यावल येथे ५ दिवसांत दुसरी हत्या; ३८ महिलेवर कुऱ्हाडीनं वार करून संपवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 10:40 PM

जावेद पटेल या संशयिताला ताब्यात घेण्यात  आले आहे.  पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

जळगाव :  तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही,  तोच ३८ वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना शहरातील काझीपुरा वस्तीत शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. यात संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.  यावल येथे पाच दिवसात हा दुसरा खून आहे. 

नाजीया खलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून संशयित जावेद युनूस पटेल (रा. काझीवाडा) याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. महिलेस  ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला.  याप्रकरणी मृत महिलेचे पती खलील काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जावेद पटेल या संशयिताला ताब्यात घेण्यात  आले आहे.  पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.