पणजी - सोमवारी रात्रीच्यावेळी अमली पदार्थ विरोधी विभागाने मडगाव येथील कदंब महामंडळाच्या बस स्थानकावर छापा टाकून साडेतीन किलो गांजा जप्त केला. या छाप्यात एका ओडिसा राज्यातील नागरिकाला अटक करण्यात आली आहे. संशयीत सिलू माळी हा ओडिसा येथील अमली पदार्थ व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी व्यवस्थित नियोजन करून सापळा रचला आणि कारवाई केली संशयिताला रंगेहात पकडण्यात यश मिळाले. या छाप्यात साडेतीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली. अमली पदार्थविरोधी विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर आणि अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
बस स्टॅन्डवर साडेतीन लाखांचा गांजा जप्त; ओडिसाच्या नागरिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 9:04 PM
अमली पदार्थविरोधी विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर आणि अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
ठळक मुद्देकदंब महामंडळाच्या बस स्थानकावर छापा टाकून साडेतीन किलो गांजा जप्त केला.या छाप्यात एका ओडिसा राज्यातील नागरिकाला अटक करण्यात आली आहे.