शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक

By धीरज परब | Published: September 17, 2022 8:26 PM

मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे . 

 लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे . 

शीतल नगर येथील शीतल साई इमारतीत नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार प्रदीप टक्के याना मिळाली .  वरिष्ठांना सांगितल्यावर अमली पदार्थ शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे , सहायक निरीक्षक विलास कुटे सह टक्के , इंगळे ,आव्हाड, घरबूडे तर मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चव्हाण , उपनिरीक्षक तानाजी सावंत सह गायकवाड , पाटील , खरमाटे , शिंदे , कवाणी व कात्यायनी यांच्या पथकाने सदनिकेवर छापा टाकला . 

त्यावेळी सदनिकेत असलेल्या जॉन केनेथ ओकोलूजी (४९) , ईझे टोनी ( ४२) रा . हटकेश व फ्रंक नवाफोर  (३४) ह्या तिघा नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले . जॉन याने शौचालयात लपवलेले १ लाख ६८ हजार किमतीचे १४ ग्राम कोकेन हे अमली पदार्थ तसेच घरातून १५ हजारांचे विना परवाना मद्य सापडले . पोलिसांनी ते जप्त केले असून तिघाहि  नायजेरियन नागरिकांना १५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे . नावाफोर कडे भारतात वास्तव्य करण्यासाठीचा परवाना नसल्याचे आढळून आले आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर