शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे

By मुरलीधर भवार | Published: January 09, 2023 5:54 PM

पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला

कल्याण- पंजाब राज्यातील माखन सिंग यांची हत्या करुन पसार झालेले तीन शार्प शूटर कल्याणनजीकच्या मोहने परिसरात भाड्याची खोली घेऊन राहत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी तिन्ही शार्प शूटरना आज पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही शार्प शूटरची नावे शिवम सिंग, गुरुमूख सिंग आणि अमनदीप कुमार अशी आहेत. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खड़कपाड़ा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही खत्री गॅंगशी संबंधित आहेत. 

शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार हे तिघे शार्प शूटर पंजाब मधील मख्खन सिंग यांचे हत्या करून कल्याण जवळील मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघे पंजाबमधील खत्री गँग चे सदस्य आहेत. मोहने परिसरात हे तिघेही खोली घेऊन राहत होते. ते लपून बसले होते. पंजाब पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. मुबई पालिसांनी ही माहिती एटीएसला दिली. एटीएस आणि कल्याण खडकपाडा पोलिसांनी सापळा रचला. तब्बल दोनशे पोलिसांनी मोहने परिसरात धाड टाकून परिसर घेरून धरला. त्यानंतर या तिघांना पकडण्यात आले. आज पहाटे चार वाजता ही मोहिम फत्ते करण्यात आली.

या कारवाईत खडकपाडा पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली. पंजाबमधील मख्खन सिंग याची हत्या झाली होती. हत्येपश्चात मारेकरी पसार झाले हाेते. पंजाब पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मनदीप सिंग याला प्रथम अटक केली. अटकेपश्चात मनदिप सिंगने हत्या प्रकरणात अन्य तीन जणांचा समावेश असून त्यांची नावे सांगितले. ते कुठे असल्याचा कयास बांधला. त्यानुसार पोलिसानी या तिघांचा सुगावा काढला. या तिघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्यांचा ट्रान्झीस्ट रिमांड घेऊन त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

एखाद्या व्यक्तीला घर भाड्याने देण्यापूर्वी त्याचा वास्तव्याचा करार करुन त्याची माहिती संबंधित हद्दीतील पोलिस ठाण्यास द्यावी लागते. कल्याण डोंबिवली हद्दीत आणि शहराला लागून असले्ल्या परिसरातील अनेक चाळी वजा घरात अनेक भाडेकरु राहतात. त्यात तुमच्या शेजारी असे शार्प शूटर तर वास्तव्य करुन नाहीत ना याची शहा निशा प्रत्येक जबाबदार नागरीकाने करुन त्याची माहिती  पोलिसांना दिली पाहिजे. अन्यथा भाड्याने घर देणारे आणि त्यांच्या शेजारी राहणारे यांच्या जिवावर एखादी घटना बेतू शकते. तसेच त्यांनाही अनूचित घटनेचे शिकार होण्याची वेळ येऊ शकते अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ते या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब