शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

केअरटेकर संस्थेच्या निष्काळजीमुळे ३ बळी; सेप्टिक टॅन्कमध्ये घुसमटून कामगारांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 7:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चारकोपमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या अर्धवट भरलेल्या सेप्टी टँकमध्ये घुसमटून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चारकोपमध्ये पालिकेच्या स्वच्छतागृहाच्या अर्धवट भरलेल्या सेप्टी टँकमध्ये घुसमटून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून केअरटेकर संस्थेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

चारकोपच्या एकता नगरमध्ये आर दक्षिण विभागाने हे शौचालय दोन महिन्यांपूर्वी बांधले. त्याच्या देखभालीचे कंत्राट न्यू एकता वेल्फेअर सोसायटी या संस्थेला देण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी स्वच्छतागृहाचा टँक स्वच्छ करण्यासाठी संस्थाचालकाने तीन खासगी सफाई कामगारांना आणले. सफाई करण्यासाठी एकजण खाली उतरला तर दोघे वर होते. मात्र, बराच वेळ तो वर आला नाही म्हणून ते दोघे त्याला शोधण्यासाठी खाली गेले. त्यावेळी आत घुसमटून त्या तिघांचाही मृत्यू झाला. 

दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिसऱ्याचा मृतदेह अग्निशमन दलाने संध्याकाळी शोधून बाहेर काढला. स्थानिकांनी कांदिवली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. टँक उघडल्यावर काही तास तो तसाच ठेऊन त्यातील गॅस निघून गेल्यानंतर आत जाणे, त्यासाठी शिडीचा वापर करणे अशा गाईडलाईन्सचे पालन करणे आवश्यक होते जे केले गेले नसल्याचाही आरोप होत आहे. 

पालिकेला पत्र दिलेकामगारांची ओळख तसेच नेमके ते कोणाची माणसे होती याची माहिती अद्याप मिळालेली नसून ती मागण्यासाठी आम्ही पालिकेला पत्र दिले आहे.- दिनकर जाधव - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे

टँक संस्थेच्या रिस्कवर उघडलास्वच्छतागृहाची काळजी घेण्यासाठी असलेल्या केअरटेकर संस्थेने स्वतःच्या रिस्कवर टँक उघडला आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्व पाळली नाहीत. सदर टँक हा जवळपास चार ते पाच फूट रिकामा असल्याने तो उघडण्याची नेमकी काय गरज भासली याबाबतची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आम्हाला दिलेल्या पत्राचे उत्तर आम्ही त्यांना देणार आहोत.- संध्या नांदेडकऱ सहायक पालिका आयुक्त, आर/दक्षिण विभाग

स्वच्छतागृहाचा टँक स्वच्छ करण्यासाठी संस्थाचालकाने तीन खासगी सफाई कामगारांना आणले. सफाई करण्यासाठी एकजण खाली उतरला तर दोघे वर होते. मात्र, बराच वेळ तो वर आला नाही म्हणून ते दोघे त्याला शोधण्यासाठी खाली गेले. त्यावेळी आत घुसमटून त्या तिघांचाही मृत्यू झाल्याचे आढळले.