ह्युस्टन - अमेरिकेच्या (America) ह्यूस्टन (Houston) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तीन वर्षांच्या मुलाने आठ महिन्यांच्या बाळाला गोळी झाडली असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. खेळता खेळता चिमुकल्याने आपल्या लहान भावावर गोळी चालवल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी ही भीषण घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या पोटात गोळी लागली आहे. तसेच गोळी झाडल्याचे समोर येताच बाळाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
ह्यूस्टन पुलिस विभागाचे पोलीस अधिकारी वेंडी बॅमब्रिज यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अतिशय दुख:द घटना आहे. या तीन वर्षाच्या मुलाला घरात ठेवलेली बंदूक सापडली असणार आणि त्यातून त्याने ही गोळी झाडली असावी अशी शक्यता त्यांनी वर्तवण्यात येत आहे. आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं तपासात समोर आलं आहे. वेंडी बॅमब्रिज यांनी पालकांना आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्या असं आवाहन देखील केलं आहे. तसेच याचा अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे.
बॅमब्रिज यांनी बंदूक आणि शस्त्रे लहान मुलांच्या हाती लागू नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना या प्रकरणातील बंदूक सापडत नव्हती. मात्र, ती बंदूक कारमध्ये पोलिसांना आढळली. या कारमधून कुटुंबीयांनी जखमी बाळाला रुग्णालयात नेले होते. चौकशी करणारे पोलीस आणि वकील या प्रकरणात दोषारोप ठेवले जावे की नाही, याबाबत विचारविनिमय करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! छापेमारीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावानं घेरलं; बेदम मारहाण करत केली हत्या
बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छापेमारी करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला संतप्त जमावाने बेदम मारहाण करत हत्या भयंकर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार. बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar) हे एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. दरम्यान हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली आहे. या प्रकारानंतर पोलीस विभागात संताप व्यक्त केला जात आहे.