ठळक मुद्देएप्रिलला संपल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक वर्षापासून अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ३० पदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मुंबई - राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व गुन्हा अन्वेषण शाखेतील (सीआयडी) अनेक वर्षापासून अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ३० पदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नवीन पदाची निर्मिती होत नसल्याने या पदाना १० महिन्याची मुदतवाढ दिल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.एसीबीमध्ये तपास व प्रशासकीय कामासाठी विविध दर्जाची २० पदे कार्यरत होती. या विभागात पुर्णवेळ पदाची निर्मिती न झाल्याने अस्थायी स्वरुपात ती चालविली जात होती. त्यांची एप्रिलला संपल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तशीस परिस्थिती सीआयडीचे मुख्यालय असलेल्या पुण्यात होती. त्याठिकाणच्या दहा पदाना पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले.