शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

'मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो'...म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 2:05 PM

मॅनेजरनुसार त्याने ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर तो रूमच्या बाहेर पोहोचला. पाच मिनिटांनंतर महिलेने दरवाजा उघडला तर त्याला सेंटर संचालक फासावर लटकलेला दिसला

हरयाणाच्या पानीपतमध्ये एका सर्वाइकल सेंटरच्या संचालकाने प्रेयसीला प्रेमाचा पुरावा देण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली.  प्रेयसी सेंटर संचालकाच्या पत्नीची नात्याने मावशी लागते आणि वयाने त्याच्यापेक्षा ८ वर्षाने मोठी आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

मॅनेजरनुसार त्याने ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर तो रूमच्या बाहेर पोहोचला. पाच मिनिटांनंतर महिलेने दरवाजा उघडला तर त्याला सेंटर संचालक फासावर लटकलेला दिसला. त्याने त्याच्या मालकाला सूचना दिली. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. (हे पण वाचा : प्रेमप्रकरण बेतले जीवावर, महिलेसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या)

दुरेजा गेस्ट हाउसचे मॅनेजर छबीरामने सांगितलं की, शुक्रवारी दुपारी २.१७ वाजता करनालच्या रतनगढ येथील ३० वर्षीय सर्वाइकल सेंटर संचालकाने १०३ नंबरची रूम बुक केली होती. ३.१० वाजता पानीपतच्या पठाण मोहल्ल्यातील ३८ वर्षीय महिलेने आधार कार्ड दाखवत आधीच्या एन्ट्रीवर सही केली.

दोघांचंही थांबण्याचं कारण आजार सांगण्यात आलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना आराम करायचा आहे. त्यानंतर साधारण पाच वाजता रूममधून ओरडण्याचा आवाज आला. मॅनेजर धावत रूमजवळ गेला आणि महिलेच्या रडण्याचा आवाज त्याला आला. तिला दरवाजा उघडण्यास सांगितलं तर ती बाहेरूनच उघड असं सांगत टाळत राहिली. साधारण पाच मिनिटांनंतर तिने दरवाजा उघडला. तेव्हा मृत व्यक्ती महिलेच्या ओढणीने गळफास घेतलेला दिसला. तेच महिला बेडवर बसून रडत होती. (हे पण वाचा : पत्नी मारते, आपटते, चावते; न्याय द्या, अन्यथा इथेच मरेन! तक्रार करायला गेलेला पती रडकुंडीला)

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. यावेळी रूममध्ये दारूच्या बॉटल सापडल्या. असा अंदाज आहे की, दारू प्यायल्यावर व्यक्तीने गळफास घेतला. पुरूषाच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पाच वर्षापूर्वी त्याचं एका तरूणीसोबत लग्न झालं होतं.  त्यांना एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. गेस्ट हाउसच्या मॅनेजरने सांगितलं की, याआधीही मृत आणि महिलेने मिळून गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली होती. ते शेवटचे दोन महिन्यांपूर्वी आले होते.  

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी