अकोला - अकोली खुर्द शेतशिवारत सुरु असलेल्या बजरंग नागेच्या बडया जुगार अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी मंगळवारी रात्री छापा टाकून अकोल्यातील प्रतिष्ठीत कुटुंबातील तब्बल 33 जुगारींना अटक केल्यानंतर या जुगारींची बुधवारी जामीनावर सुटका करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने आकोली खुर्द येथील जुगार अड्डयावर छापा टाकून दिलीप रणछोडदास अग्रवाल रा. राम नगर, प्रदीप धनाजी गुप्ता रा. अग्रेसन भवन, प्रकाश गोपीलाल छावला आळशी प्लॉट,, सुभाष गणपतराव खंडेलवाल आळशी प्लॉट, मोहन गणेश गिरी जुने शहर, अनिल काशिनाथ पोहरकर मोठी उमरी, बाबाराव उत्तमराव वाकोडे मोठी उमरी, पांडुरंग दशरथ कवडकर रा. खामगाव, लक्ष्मण यादवराव केकान खामगाव, मोहम्मद इमरान मोहम्मद निजाम रा लककडगंज, गुलाम नबीब मोहम्मद सालार बाळापूर, आनंद विद्याधर सरदार रा हरिहर पेठ, सलिम कन्हैया गवळी खामगाव, सिधांत अनिल चांडक हरिहर पेठ, सय्यद रहीम सय्यद गनी खामगाव, दीपक हरिराम शर्मा चिखली,शेख सोहेल शेख लतीब रामदास पेठ, एकनाथ विश्वनाथ वरुडकर शेगाव, शेख राजू शेख अब्दुल्ला खामगाव,जाकिर खान हुसेन खान जुने शहर, साहेबराव रामराव मोरे शिवसेना वसाहत, रवी अशोक डुकरे मालेगाव वाशिम, अब्दुल समद अब्दुल हमीद रा शिवाजी नगर, एजाज इकबाल औरंग इकबाल रा भीम नगर जुने शहर, रमेश बळीराम अबुसकर शेगाव वरखेड, गणेश विश्वनाथ टाकसाळकर रा अनिकट, गजानन मनोहर शंके शेगाव, हर्षानंद देवानंद बागडे आदर्श कॉलनी, अनिल गोवर्धन चांडक हरिहर पेठ, गुलाम हुसेन अफसर अली अकोट फाईल, पुरषोत्तम मिनीलाल अढिया आळशी प्लॉट, राजू नारायण श्रीनाथ रा बाळापूर नाका, बजरंग नागे रा राजकमल टॉकीज जवळ, अश्विन बागडे मोठी उमरी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी पहाटे या जुगारींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.५ कर्मचाऱ्यांनी पकडले ३३ जुगारीविशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे आणि त्यांच्या चार कर्मचाºयांनी जुगार अड्डयावर छापा टाकून तब्बल ३३ जुगारींना अटक केली. पाच कर्मचाºयांनी केलेली कारवाई ७० अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असलेल्या स्थानीक गुन्हे शाखेच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारी असल्याची चर्चा आहे.