सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार तपास पथकाने सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडे तपास केला असता जून महिन्यातील ३५ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळवले. त्यामध्ये साडेपाच तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने एक पिकअप, तीन मोटरसायकली असा ३७ लाख ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली. अशा एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली. वर्षभरात १४३ गुन्हे उघड झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांकडून देण्यात आली.
सुभाष चव्हाण (सवतगव्हाण, ता. करमाळा), धर्मेंद्र विलास भोसले (रा. सिंधगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव), रवी ऊर्फ बाबुल मोहन काळे (दाळे गल्ली, पंढरपूृर), सुनील ऊर्फ खल्या तुकाराम काळे (रा. फकिराबाद, ता. जामखेड), संदीप ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले (दोघे रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमनगर), विकास टाक (रा. गेवराई, जि. बीड, सराफ), बाळू पांडुरंग शिंदे (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), शीतल कांतीलाल पवार (नागजरी, ता. गेवराई, जि. बीड), सलीम ऊर्फ दीपक नारायण भोसले (रा. वाहिरा, ता. आष्टी जि. बीड) अशी अटक अशी विविध गुन्ह्यात अटक केलेल्या १० आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी अकलूज, अक्कलकोट उत्तर, मंगळवेढा, कुर्डूवाडी, करकंब, करमाळा या सहा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक, प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक, शशिकांत शेळके, नागनाथ खुने, फौजदार सुबोध जमदाडे, सूरज निंबाळकर, रविराज कांबळे, राजू डांगे, राजेश गायकवाड, सहा फौजदार शिवाजी घोळवे, ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, हवालदार धनाजी गाडे, परशुराम शिंदे, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, विजयकुमार भरले, मोहन मनसावाले, रवी माने, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, अक्षय दळवी, अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, अक्षय डोंगरे, यश देवकते, समीर शेख, सतीश बुरकुल, राहुल माने, अशोक हलसंगी, लक्ष्मीकांत देडे, सहा. फौजदार श्रीकांत निकम, हवालदार विक्रम घाटगे यांनी बजावली.
महिनाभरातील कामगिरीजून २०२४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचे एकूण ३५ गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यातील ५०५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४४० ग्रॅम चांदीचे दागिने, १ पिकअप, ३ मोटारसायकली असा एकूण ३७ लाख ४४ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वर्षभरात १४३ घरफोड्यांचा छडास्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी जून २०२३ ते जून २०२४ या १ वर्षाच्या कालावधीत १४३ गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये १ कोटी ४३ लाख ४४ हजार ८४१ रुपयांचे ३३२ तोळे दागिने जप्त केले आहेत.