शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

बुलढाणा हादरला! ३५ वर्षीय महिलेवर ८ नराधमांचा बलात्कार; राजूर घाटातील घटना

By निलेश जोशी | Published: July 13, 2023 11:36 PM

बुलढाणा शहरा नजीकच्या राजूर घाटातील घटना: आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मोताळा : बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच राजूर घाटातून दुपारी जात होती. दरम्यान राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता त्यांच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरी नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केल्याचे यासंदर्भातील पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. पीडित महिला व तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील ४५ हजार रुपये लुटले. सोबतच महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. सोबतच पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या घटनेची माहिती अन्य शिवसेना तथा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना (शिंदे गट) यांना कळाल्यानंतर त्यांनीही तातडीने रात्री बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आ. संजय गायकवाड यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनाही कल्पना दिली. त्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हालचाल सुरू केली. घटनेचे गांभिर्य पहाता पोलिस अधीक्षकांनी बुलडाणा शहरचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, धामणगाव बढेचे ठाणेदार भोरकडे, पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांना तातडीने बोराखेडी पोलिस ठाण्यात पाठवले. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असल्याची चर्चा आहे.

आमदार गायकवाड यांचा पोलिस ठाण्यात ठिय्याया गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत आ. संजय गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला होता. जोपर्यंत प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाणे न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतलीहोती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणात गांभिर्याने कारवाई सुरू केली.

पीडीत महिलेची प्रकृती चांगलीया घटनेतील पीडित महिलेची प्रकृती चांगली असल्याची माहिती बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. सोबतच तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :MolestationविनयभंगSanjay Gaikwadसंजय गायकवाड