लखनऊ - उत्तर रेल्वेच्या लोको फॅक्टरीत एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी खोटी माहिती देऊन 35 वर्षे काम करत राहिली. तिचे लग्न दुसर्या विवाहित व्यक्तीशी झाले, पण विभागाला कळवले नाही आणि नोकरीचा कालावधी संपल्यानंतर निवृत्त झाली. या प्रकरणात, पहिली पत्नी असलेल्या या महिलेने पीएमओकडे दाद मागितली आहे. 1984 मध्ये लोको कारखान्यात कामगार असलेले अशोक कुमार पाल यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मधु यांना ३ मे, १९८४ रोजी अनुकंपा योजनेतून कनिष्ठ लिपिकची नोकरी मिळाली. असा आरोप आहे की, ४ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांनी विवाहित राम अवध पालशी लग्न केले होते. हिंदू विवाह कायद्याच्याविरोधात हे लग्न केले होते. राम अवध पाल यांची पहिली पत्नी शंभू आपल्या दोन मुलांबरोबर अलीगंजमध्ये राहत होती. शंभूने आरोप केला आहे की, तिच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच तिने रेल्वेमध्ये तक्रार केली, पण अधिकारी दुर्लक्ष करत राहिले. त्याचवेळी मधु पाल सांगते की, तिच्या सासरच्या घरी गेल्यावर नवऱ्याचा पहिला विवाह झाला होता हे कळाले. तर शंभू देवीने आरोप केला आहे की, मधुने नियुक्ती पत्रात दुसऱ्या पतीच्या घराचा पत्ता लिहिला होता.आईचे हक्क मिळविण्यासाठी शंभू देवी यांचा मुलगा संदीप यांनी पीएमओकडे तक्रार केली. त्यानंतर पीएमओने गेल्या वर्षी जूनमध्ये लोको वर्कशॉपकडे जाब विचारला. यावर रेल्वेने 31 ऑक्टोबर 2019 रोजी प्रत्युत्तर पाठविले. संदीपच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या आईसोबत सतत पायपीट करत राहिला, परंतु 35 वर्षांचा जुना फॉर्म तेथे नसल्याचे सांगत अधिकारी त्रास देत राहिले.
कारखान्याच्या कर्मचार्यांकडे जे काही फॉर्म उपलब्ध असतील, शंभू देवी उपलब्ध करुन देण्यात येतील. 984 मध्ये नोकरी मिळवतानाच्या परिस्थितीची माहित नाही. - विवेक खरे, मुख्य कारखाना व्यवस्थापक, लोको कार्यशाळा
आणखी वाचा...
युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला
कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार; पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवटीचे संकेत
Video "चार बायका, २६ मुले, त्यांना खायला कुठून आणू?" पाकिस्तानीची व्यथा
किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण किम यो जोंग
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन