कोलकाता: कोविडशी संबंधित निर्बंधांचे उल्लंघन करत कोलकाता येथील पंचतारांकित हॉटेलमधून रविवारी पहाटे ३७ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्क स्ट्रीटवरील पार्क हॉटेलमध्ये केलेल्या छाप्यात दोन हाय-एंड कार आणि ३८ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, “पार्क हॉटेल येथे मध्यरात्री१.१५ वाजताच्या दरम्यान छापा टाकण्यात आला आणि कोविडशी संबंधित निर्बंधांची पायमल्ली करून जोरदार म्युझिक लावून पार्टी केल्याबद्दल दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ३७ लोकांना अटक करण्यात आली. छापेमारी दरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजणांनी पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली व त्यांना मारहाण केली. पोलिसांनी दोन पायनियर डीजे डिस्क, एक एम्पलीफायर, दोन साउंड बॉक्स, एक डीजे लाईट, तीन हुक्का, दारूच्या चार बाटल्या आणि गांजा 'पुरिया' ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.आयपीसी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पुढे त्यांनी माहिती दिली.
पार्टी करणं भोवलं; कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ३७ जणांना पंचतारांकित हॉटेलमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 1:20 PM
37 Arrested From Top Kolkata Hotel : शहराच्या मध्यभागी असलेल्या पार्क स्ट्रीटवरील पार्क हॉटेलमध्ये केलेल्या छाप्यात दोन हाय-एंड कार आणि ३८ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देछापेमारी दरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी काहीजणांनी पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली व त्यांना मारहाण केली.