दिल्लीत आरटीओजवळील रिंग रोडवर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात १४ वर्षीय मुलासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तांदळाच्या गोण्यांनी भरलेला भला मोठा कंटेनर हा रिक्षेवर पलटला. या अपघातात रिक्षा चालकासह त्यातील प्रवासी असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी सकाळी एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि रिक्षात बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी भला मोठा कंटेनर रिक्षावरच पलटला आणि ही दुर्दैवी घटना घडली. यानंतर तातडीने पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र रिक्षातून मृतदेह काढणं अवघड होतं. कारण मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या कंटेनरमध्ये ५० टन तांदूळ भरलेले होते. यामुळे तो हटवण्यासाठी आधी वाहतूक पोलिसांनी दोन क्रेन बोलावल्या. तसेच आणखी क्रेनची गरज भासली. तब्बल अडीच तासांनी चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
झोपलेल्या पती-पत्नीवर घरात घुसून धारदार चाकूने केले सपासप वार
मृतांमध्ये रिक्षा चालक सुरेंद्र कुमार यादव (37), त्याचा पुतण्या जय किशोर यादव (31) आणि दोन प्रवासी कोमल सिंह (35) व कोमल यांचा भाचा प्रकाश (14) यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी सुरेंद्र प्रवासी घेऊन शास्त्री पार्कमधील सराय काले खाच्या दिशेने जात होते. यावेळी सुरेंद्रचा पुतण्या जय किशोर देखील चालकाच्या शेजारील सीटवर बसला होता. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अक्षरश: रिक्षाचा चक्काचूर होऊन छत रस्त्यावर पडलं होतं. अपघात इतका भयंकर होता की शेवटी रिक्षा कापून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.