गोंदिया - देवरीच्या वॉर्ड क्र. ९ येथील आरोपीने साडे चार वर्षाच्या मुलीवर १ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता बलात्कार केला होता. या प्रकरणातील नराधमाला २१ वर्षाचा सश्रम कारावास व ७५ हजार रूपये दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेतील ५० हजार रूपये पीडितेला द्यावे. दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावास जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्वीन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने ४ वर्ष सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार केला. चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष देऊन आपल्या घरी नेले. तिच्यावर बळजबरी केली. आरोपीने त्या पिडीतेला दोन-चार वेळा चाकलेट देण्याचे आमिष देऊन आपल्याकडे बोलावले होते. परंतु ती गेली नव्हती. परंतु आरोपीने संधी पाहून तिला आपल्या घरी नेले. तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर देवरी पोलीसांनी भादंविच्या कलम ३७६ (ए,बी), बाल लैंगीक अत्याचार अधिनियमाचे कलम ६, १० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केला होता. न्यायालयात १५ साक्षदार तपासण्यात आले. आज (दि.७) रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहिले. या घटनेला घेऊन देवरी येथील नागरिक पुढे आले होते. तीन दिवस बंद पुकारून आरोपीला त्वरीत शिक्षा व्हावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.२५२ दिवसात आला निकालबाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे शासनानचे विशेष लक्ष आहे. देवरी येथे घडलेला गुन्हा ते न्यायालयाकडून दिलेला निर्णय हे एकंदरीत २५२ दिवसात हा निकाल देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्वरीत दिलेल्या निकालामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
४ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला २१ वर्षाचा सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:15 PM
जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल: पीडितेला ५० हजार रूपये मदत देण्याचे आदेश
ठळक मुद्देया दंडाच्या रकमेतील ५० हजार रूपये पिडीतेला द्यावे. दंड न भरल्यास ३ वर्षाचा अतिरिक्त कारावास जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावला आहे.देवरी येथील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राहणारा आरोपी अश्वीन उर्फ सोनू विठ्ठल मेश्राम (२९) याने ४ वर्ष सहा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार केला.