शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

क्रौर्याची परिसीमा ; चार वर्षांच्या चिमुरडीचा जन्मदात्या आईकडून जमिनीवर डोके आपटून खून,पिंपळे गुरव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:48 PM

घरातले दशक्रिया विधीला गेले होते, त्याचवेळी मुलीचा त्रास सहन होत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली.

पिंपरी : चार वर्षांच्या मुलीचा त्रास सहन न झाल्याने आईने मुलीचे डोके जमिनीवर आपटले. आणि मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळुन मुलीला संपवले. हा धक्कादायक प्रकार पिंपळेगुरव येथे सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. मुलीच्या त्रासामुळे आईकडून रागाच्या भरात झालेला खुन या यामुळे परिसरातील नागरिक याप्रकारच्या अमानुष कृत्याने धास्तावले आहेत. 

सविता दीपक काकडे (वय २२, रा. भालेकर नगर, पिंपळे गुरव, सांगवी) या कूर कृत्य करणा-या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रिया दीपक काकडे (वय ४) असे या घटनेत मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काकडे यांच्या आईचे निधन झाले असून  त्यांच्या दशक्रिया विधीसाठी काकडे कुटुंबीय सोमवारी सकाळी आळंदी येथे गेले होते. बाराच्या सुमारास काकडे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा रिया निपचित पडली होती. ती खूप त्रास देत असल्याने तिला मारून टाकले असे सविता हिने कुटूंबियांना सांगितल्या नंतर सर्वांची बोबडीच वळली. कुटुंबीयांनी धावपळ करीत तिला वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रिया त्रास देत असल्याने तिच्या आईने तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर मोबाईल चार्जर च्या वायरने तिचा गळा आवळला. रिया हिच्या कवटी चा पूर्णत: चुरा झाला असून, सविताने हे कृत्य केले कसे याचाही शोध घेतला जात आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना सविताचा सहा महिन्यांचा मुलगा घरातच होता. तिने हे कृत्य केल्यानंतर कुटूंबियांना फोन करून ही माहिती दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सविताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवMurderखूनChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाPoliceपोलिसArrestअटक