शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
3
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
4
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
5
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
6
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
7
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
8
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
9
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
10
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
11
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
12
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
13
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
14
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
15
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
16
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
17
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
19
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
20
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

चोरीस गेलेले ४२ तोळे दागिने मध्य प्रदेशातून केले हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:23 AM

Crime News : दोन साथीदार तसेच एका दहावर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले.

ठाणे : ठाण्यातील एका लग्न समारंभातून चोरीस गेलेले १९ लाख तीन हजारांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने थेट मध्य प्रदेशातील एका गावातील चोरट्यांच्या घरातून कासारवडवली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘जलसा लॉन’ येथे अनिता सिंग यांच्या मुलाचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी विवाहसोहळा सुरू होता. त्यावेळी नवरानवरीबरोबर रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोटो काढत असताना अनिता यांनी खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची बॅग काही क्षणांत चोरीस गेली. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोबाइल आणि ९० हजारांची रोकड होती. याप्रकरणी १ डिसेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, निरीक्षक जयराज रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील गुलखेडी गावातून अट्टल चोरटा बबलू सिसोदिया याचे घर शोधले. बबलूने त्याच्या अन्य दोन साथीदार तसेच एका दहावर्षीय मुलाच्या मदतीने ही चोरी केल्याचे तपासात उघड झाले. बबलूचे नाव यामध्ये समोर आल्यावर त्याच्या मध्य प्रदेशातील घरात २० डिसेंबर रोजी झडती घेऊन पालवे यांच्या पथकाने चोरीस गेलेल्या एक लाख ५७ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह ४२३ ग्रॅम वजनाचे १९ लाख तीन हजार ५०० रुपयांचे जवळपास सर्वच दागिने हस्तगत केले. चोरीतील दोन मोबाइल आणि ९० हजारांची रोकड मात्र या झडतीमध्ये मिळाली नाही. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर बबलूसह त्याचे साथीदार मात्र तिथून पसार झाले. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास डॉ. राठोड यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारी