नवी दिल्ली / जम्मू : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मानवी तस्करीशी संबंधित लोकांना अटक करण्यासाठी देशभरात छापे टाकले. या कारवाईत म्यानमारमधील एका व्यक्तीसह एनआयएने ४४ जणांना अटक केली. सीमा सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलिसांसह एनआयएने केलेल्या कारवाईत देशभरातील ५५ ठिकाणी छापे टाकले. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, मानवी तस्करी करणाऱ्यांवरील कारवाईसाठी त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि पुड्डुचेरी येथे शोध घेण्यात आला. या कारवाईत अटक केलेल्या ४४ पैकी सर्वाधिक २१ जण त्रिपुरातील आहे. जफर आलमला पहाटे जम्मूच्या बठिंडी भागातून ताब्यात घेण्यात आले.
त्रिपुरा २१कर्नाटक १०आसाम ५प. बंगाल ३तामिळनाडू २पुद्दुचेरी १तेलंगणा १कर्नाटक १