कस्टम अधिकारी सोन्याची तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत आहेत. काही दिवसांपूर्वी हैद्राबादच्या कस्टम टीमने दुबईहून आलेल्या एका महिलेच्या बॅगमधून ९६ लाख रूपयांचं सोनं जप्त केलं होतं. आता एका ताज्या घटनेत जयपूर कस्मट टीमने आणखी एका दुबईहून आलेल्या महिलेकडून ३१ लाख रूपयांचं सोनं जप्त केलं. दुबईच्या शारजाह एअरपोर्टहून भारतात आलेल्या या महिलेने लाखो रूपयांचं सोनं आपल्या अंडरगारमेंट्समध्ये लपवलं होतं.
महिलेकडून जयपूर एअरपोर्टवर कस्टमच्या टीमने ३१ लाख रूपयांचं सोन जप्त करून तिला अटक केली. मात्र, तिच्या नावाचा खुलासा केला नाही. कस्टम अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय महिला मुंबईची रहिवाशी आहे. ती मंगळवारी दुबईच्या शारजाह एअरपोर्टहून जयपूरला पोहोचली होती. जयपूर एअरपोर्टवर १२ दिवसात लाखो रूपयांचं सोनं पकडल्याची ही दुसरी घटना आहे.
सीक्रेट पॅकेटमध्ये लपवलं होतं ५९२ ग्रॅंम सोनं
कस्टम क्लीअरन्सच्या तपासादरम्यान काही अधिकाऱ्यांना संशय आला आणि महिलेची पुन्हा झडती घेतली. महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये एका सीक्रेट पॉकेटमध्ये ५९२ ग्रॅम सोनं लपवलं होतं. एका प्लास्टिकच्या पाउचमध्ये पेस्टच्या रूपात सोनं लपवलं होतं. या सोन्याची किंमत ३१ लाख रूपये असल्याचं सांगितलं जात आहे.
बॉयफ्रेन्डने दुसऱ्याला देण्यासाठी दिलं होतं
चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, तिला हे सोन्याचं पॅकेट दुबईत राहणाऱ्या तिच्या बॉयफ्रेन्डने दिलं होतं. महिलेच्या बॉयफ्रेन्डनेच तिचा येण्या-जाण्याचा खर्च आपल्याकडून केला होता. महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, 'पॅकेट देताना बॉयफ्रेन्ड म्हणाला होता की, जयपूर एअरपोर्टवर एक व्यक्ती भेटेल त्याला हे दे'.