शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 6:06 PM

Mansukh Hiren Case : या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देगुरुवारी विशेष NIA कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखाचा व्यवहार झाल्याचा संशय NIA ने व्यक्त केला. 

मुंबई -  राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. अँटिलिया येथे कारमध्ये सापडलेल्या स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता चार महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणात अलीकडेच एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देखील NIA अटक केली आहे. या प्रकरणात चार महिन्यांनंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुरुवारी विशेष NIA कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखाचा व्यवहार झाल्याचा संशय NIA ने व्यक्त केला. 

 

NIA ला या ४५ लाखांच्या व्यवहाराबाबत तपासात माहिती मिळाली आहे. लाल रंगाच्या तवेरा गाडीत मनसुख यांची हत्या केल्यानंतर मारेकरी नेपाळला पळून गेला, असे एनआयएने सांगितले. ४ मार्चला घोडबंदर रोडवर हिरेन सोबत मारेकरी दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज मिळल्याचे NIA च्या सूत्रांनी सांगितले.गुरुवारी NIA कोर्टासमोर आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी आणि मनिष बसत सोनी यांना हजर करण्यात आले. NIAने दोन्ही आरोपींची आणखी पाच दिवसांसाठी कोठडी मागितली. ४५ लाखाचा जो व्यवहार झाला, त्या आधारावर NIA ने आरोपीची कोठडी वाढवून मागितली आहे. हिरेनच्या हत्येसाठी इतकी रक्कम मोजल्याचा एनआयएला संशय आहे. ४५ लाखांच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्याचे NIAने म्हटले आहे. अँटिलीयाच्या घटनेनंतर हा पैसा मनसुखच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे, कारण मनसुख निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या आदेशाचे पालन करीत नव्हता. एनआयएने म्हटले आहे की, या हत्येतील ४५ लाख रुपयांचा फंड हा अल्प प्रमाणात आहे, त्यात कोट्यावधी रुपये खर्च झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCourtन्यायालयNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाfundsनिधी