काेंढाळी(जि. नागपूर) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी येथे खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नांत अनियंत्रित कारने दुभाजक ताेडून सर्व्हिस रस्त्यालगत बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच जणांना उडविले. यात चाैघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला.
बंडू सालवणकर (५५), चिन्नू सोनबरसे (१३), शाैर्य डोंगरे (९) व शिराली डोंगरे (६ ) अशी मृतांची नावे आहेत. ललिता सोनबरसे (५०) या गंभीर झाल्या आहेत. हे सर्वजण बसस्टाॅपजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे हाेते. त्यातच अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने बसस्टाॅपजवळील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नांत थेट दुभाजकाला जाेरात धडक दिली. कार दुभाजक ताेडून थेट प्रवाशांच्या अंगावर आली आणि सर्व्हिस रस्त्यावर उलटली. यात पाचजण गंभीर जखमी झाले. चारजण इस्पितळात नेताना दगावले.