शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

माथाडी मंडळाच्या खात्यातून 5 कोटी गायब, बँक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कट,  तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:57 AM

Crime News : सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- मनीषा म्हात्रे

मुंबई : माथाडी मंडळाच्या बचत खात्यातून बनावट धनादेशद्वारे तब्बल ५ कोटी ६ रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पैसे मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.सहायक कामगार आयुक्त अशोक लक्ष्मण डोके (५३) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ फेब्रुवारीपासून रेल्वे गुडस्‌ क्लीअरिंग अँँड फाॅरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट लेबर बोर्ड, मुंबई या माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. ८ फेब्रुवारीपासून ते या पदावर कार्यरत आहेत.याच मंडळाचे बचत खाते मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आहे. डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. यात, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत यावर्षी ७ जानेवारी ते १२ मार्चदरम्यान बनावट धनादेशाद्वारे खात्यातील ५ कोटी ६ लाख इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे दिसून आले.त्यांनी तात्काळ याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, हे पैसे बँकेकडून बँकेच्याच मध्यप्रदेश, छत्तीसगड, रायपूर येथील शाखेत वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यात, मंडळाच्या बनावट धनादेश आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आला. याचे सर्व मूळ धनादेश मंडळाकडे आहेत. अशात, एवढ्या मोठ्या स्वरूपात रक्कम ट्रान्स्फर होत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.अशात, बँक ऑफ बडोदा यांचे संबंधित शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, अधिकारी व इतर अनोळखी इसम यांनी एकमेकांशी फौजदारी कट रचून व संगनमत करून फसवणुकीच्या उद्देशाने व सदरच्या रकमेचा अपहार केल्याचा संशय वर्तवत त्यांनी तात्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ६ एप्रिल रोजी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांनी दुजाेरा दिला. ते पैसे गोठविण्यात आले असल्याची माहितीही समोर आली आहे.

खात्यातील पैसे दुसरीकडे वर्गबनावट धनादेशद्वारे मंडळाचे पैसे वर्ग केल्याचे समजताच तातडीने पोलिसांत तक्रार देत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संबंधित खात्यांतील उर्वरित रक्कम अन्य खात्यांत वर्ग केली असून, खात्यात फक्त ८ हजार रुपये ठेवले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा लवकरच याचा तपास लावेल असा विश्वास आहे.- अशोक लक्ष्मण डोके, प्रभारी अध्यक्ष, माथाडी मंडळ

...अन् गैरव्यवहार झाल्याचे उघड!मस्जिद बंदर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत याच मंडळाचे बचत खाते आहे. त्यामुळे डोके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात बँक खात्याचा तपशील मागवला. पडताळणी करताना, पासबुक नोंदीतून समोर आलेल्या माहितीत बनावट धनादेशाद्वारे खात्यातील तब्बल ५ कोटी ६ लाख रुपये इतकी रक्कम अन्य ठिकाणी ट्रान्स्फर करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँक