मुंबई - २५ मार्चला कुर्लारेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर अस्वच्छ लिंबू पाणी बनविणाऱ्या कुर्ल्यातील त्या स्टॉलवर कारवाई करत तो बंद करण्यात आला. मात्र, ज्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक अशा अस्वच्छ स्टॉलचे बिंग सिद्धेश पावले या तरुणांमुळे सर्वांसमोर उघड झाले. या घटनेचा व्हिडीओ वायरल होताच मध्य रेल्वे प्रशासनानं घटनेची तातडीनं दखल घेत, स्टॉल मालकाविरोधात कारवाई करत स्टॉलला टाळं ठोकलं. नंतर या विक्रेत्याच्या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे या विक्रेत्याविरोधात ५ लाखांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेनं केलेल्या या तपासणीत लिंबू सरबतामध्ये ई-कोलाय हे जीवाणू जास्त आढळून आले. या जीवाणूंमुळं प्रवाशांमध्ये ताण वाढणं, अतिसार होऊ शकतो. तसंच, या लिंबू सरबतामुळं प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग
कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबतवाल्याचा 'तो' व्हिडिओ या तरुणाने काढला...