मुंबई - विरार येथील आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी माहिती देणाऱ्याला सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले काहे. सीबीआयच्या विशेष पथकाकडून आरटीआय कार्यकर्ता प्रेमकांत झा यांच्या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. मंगळवारी याबाबत सीबीआयने एका मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन हत्येप्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून रोख रक्कम ५ लाख देण्याचे जाहीर केले आहे.
२४ फेब्रुवारी २०१२ साली विरार येथील आरटीआय कार्यकर्ते प्रेमकांत झा यांचा मृतदेह विरार हायवेवर आढळला होता. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ऑक्टोबर 2014 साली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने 2016 मध्ये या प्रकरणी दोन जाणांना अटक केली होती. प्रेमकांत हे भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती या सामजिक संस्थेचे सदस्य होते. त्यांनी विरारमधील अनधिकृतबांधकामबाबत अनेक तक्रारी करून बांधकामांची महिती मागवली होती. प्रेमकांत झा यांच्यावर अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गोवण्यात आले होते.