शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

खळ्ळ खटॅक! दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड करणाऱ्या ५ मनसैनिकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 5:55 PM

Delhi Capitals bus attacked by MNS, IPL 2022 : पोलिसांकडून त्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

Delhi Capitals bus attacked by MNS, IPL 2022: हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघ मुंबईत जमायला सुरूवात झाली आहे. मुंबईतील तीन वेगवेगळ्या मैदानांवर लीगचे सामने होणार आहेत. पण त्यापूर्वीच मुंबईत राडा झाल्याचं दिसून आलं. मंगळवारी मुंबईत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसची तोडफोड करण्यात आली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ५-६ कार्यकर्त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड केली. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी प्रशांत गांधी, संतोष जाधव, बाजीराव कुंभार, भरमु नागरूनकर आणि देवेंद्र परमेकर मनसैनिकांना अटक केली आहे. 

पोलिसांकडून त्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सुदैवाची बाब म्हणजे, ही बस पार्किंगमध्ये असल्याने बसमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बसची तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत. ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या बसेसची तोडफोड करण्यात केली. आयपीएलमध्ये संघांनी बसचे कंत्राट बाहेरील राज्याच्या म्हणजेच दिल्लीच्या कंपनीला दिल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली. हे कंत्राट स्थानिक कंपनीला म्हणजेच महाराष्ट्राला दिले जायला हवे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये IPL चे एकूण ५५ लीग सामने खेळवले जातील. हे सामने सीसीआय, डी वाय पाटील आणि वानखेडे मैदानावर होणार असून सर्व संघ मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जमले आहेत. २६ मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

 

 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२PoliceपोलिसMNSमनसेArrestअटक