शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 6:39 AM

गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत.

मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीच्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत.

या खंडणीप्रकरणात  राजनचा खास हस्तक आणि पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणातील आरोपी रोहित जोसेफ ऊर्फ सतीश काल्या याचाही सहभाग असून खंडणीविरोधी पथक अधिक तपास करत आहे. विशेष म्हणजे पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सतीश कालिया याची पॅरोलवर सुटका झाली होती. 

पालघरची रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय महिलेने तिचे वांद्रे येथील १,३०० चौरस मीटरचे मालमत्ता क्षेत्र एका बांधकाम व्यावसायिकाला विकले होते.  मालमत्ता तपासणीसाठी गेले असता व्यावसायिकाला तेथे पॉलसन आणि  कालिया भेटले. पॉलसनने धमकी देत १० कोटीची मागणी केली होती.

तक्रारीनंतर तत्काळ कारवाईखंडणीची मागणी होत असल्याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे आल्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण थोरात यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला.तपासात कुख्यात छोटा राजन टोळीचा सहभाग समोर आला. आरोपींनी व्यावसायिकाकडे १० कोटी  खंडणीची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन कोटी रुपये देण्याचे ठरले होते. छोटा राजन टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांनी सरोडी याच्यासह प्रदीप यादव, भारद्वाज, फर्नांडिस, शशिकांत यादव यांना बेड्या ठोकल्या.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबई