अहमदाबाद - गुजरातच्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलगा पाहता पाहता कोट्यधीश होतो. आयुष्य ऐश आरामात जगू लागतो. ज्या कुटुंबाकडे महिन्याचं रेशन भरायलाही पैसे नाहीत त्या घरातील मुलाकडे पाहून सगळेच हैराण झाले. हे प्रकरण अहमदाबादमधील धंधुका शहरातील आहे. ज्याठिकाणी १७ वर्षीय मुलगा मागील १० महिन्यापासून शानदार जीवन जगत होता.
या मुलाने गोव्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुट्टी एन्जॉय केली. त्याचसोबत सेकंड हँड लग्झरी कार आणि दुचाकीही खरेदी केली. मुलाने केलेली अय्याशी एका सीनिअर सिटिजनच्या खात्यात फसवणूक करून केली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुलाला बालसुधार गृहात पाठवले आहे. चैनीत जीवन जगण्यासाठी मुलाने ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ४७ लाख रुपये लंपास केले. जेव्हा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले. त्याने कशी ही योजना बनवली आणि कोट्यवधी झाला हे चौकशीत सांगितले. तेव्हा पोलीसही हैराण झाले.
आरोपी मुलगा १० महिन्यापासून श्रीमंत माणसांचे आयुष्य जगत होता. त्याने सेकंड हँड कार खरेदी करा. त्याशिवाय गोवा, राजस्थान या राज्यात भटकंती केली. इतकेच नाही तर त्याने शेअर बाजारात ८ लाख रुपये गुंतवणूकही केली. इतक्या कमी वयाने मुलाने केलेली प्लॅनिंग ऐकून पोलीस पाहतच राहिले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युवकाने देश सोडून अमेरिकेला जाणाऱ्या प्रो. नरोत्तम पटेल यांच्या खात्यातून ही रक्कम जमवली.
प्रोफेसरचा मोबाईल नंबर हा टेलिकॉम कंपनीकडून या युवकाला देण्यात आला होता. हा नंबर त्यांच्या बँक खात्याशी अपडेट होता. प्रोफेसर २०१८ मध्ये देश सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांनी मोबाईल नंबर बँक खात्याशी अपडेट केला. परंतु ही गोष्ट युवकाला जेव्हा त्याने व्हॉट्सअप इन्स्टॉल केले तेव्हा कळाली. व्हॉट्सअप बॅकअप घेतल्यानंतर त्याला पासबुकची कॉपी मिळाली. ही माहिती मिळाल्यावर मुलाच्या डोक्यात कल्पना आली. त्याने २ मित्रांच्या सहाय्याने हा कारनामा केला.
आरोपी मुलाचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करत होते, कुटुंब एका कच्च्या घरात राहायचे. कुटुंबाने मुलातील बदल पाहिले परंतु त्याला प्रश्न विचारले नाहीत. अलीकडेच युवकाने २ आयफोन खरेदी केले. मुलाचे आयुष्य अचानक बदलल्याने लोकांचेही लक्ष त्याच्याकडे गेले. अनेकजण त्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर चर्चा करत होते. परंतु मुलगा काय करतो त्याची कुणीही दखल घेतली नाही. मात्र कालांतराने ही बाब पोलिसांना कळाली. त्यांनी या घटनेची चौकशी करत मुलाला ताब्यात घेतले.