ठाणे : मुलीला मुल-बाळ होत नसल्याने कचरा वेचकाच्या ५ वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱ्या कळव्यातील ६० वर्षीय वयोवृद्ध उषा साळवे नावाच्या महिलेला कळवा पोलिसांनी अटक केली. तसेच अपहरणाच्या गुन्हयातील ५ वर्षाच्या मुलाची अवघ्या ४८ तासात सुखरूप सुटका केली. तर हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच अपहारणकर्त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी
कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टी येथून १४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कचरा वेचक प्रसाद कुटुंबातील ५ वर्षीय आदित्य नामक बालकाला राहत्या घराजवळून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार १५ मे रोजी गुन्हा दाखल करत कळवा पोलिसांनी काही एक ठोस माहिती नसताना तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचा बारकाईने अभ्यास करून त्याआधारे अपहृत मुलगा व संशयित महिलेच्या वर्णनावरून कळवा - ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, चेंदणी कोळीवाडा, सिडको बस स्टॉप परिसर, काल्हेर, भिवंडी इत्यादी परिसरातील रिक्षा चालक, दुकानदार यांच्यांकडे बारकाईने केलेल्या चौकशीत तो मुलाला एका महिलेने नेल्याची माहिती पुढे आली.
इंद्राणी मुखर्जी ७ वर्षांनी येणार जेलबाहेर, सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
याचदरम्यान ती महिला कळव्यात राहत असल्याचे स्पष्ट झाल्यावर मोबाईल लोकेशन व सीडीआर वरून उषा धोंडीराम साळवे,(६०),या महिलेला घोडबंदर रोड, मानपाडा, येथून ताब्यात घेतली. चौकशीदरम्यान त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिले. तसेच पळवून नेले मुलास भिवंडीत नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्या बालकाची सुटका करत त्या बालकास पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अंबुरे यांनी दिली. ही कामगिरी कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक (प्रशासन), जितेंद्र कुंवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण बघडाणे, दिपक घुगे आदी पथकाने केली.