मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक खळबळ उडविणारी घटना उघडकीस आली आहे. थोड्या थोडक्या नव्हे तर ५४ नर्स या प्रकरणात पीडित आहेत. सरकारी गांधी मेडिकल कॉलेजशी संबंधीत हमीदिया हॉस्पिटलच्या नर्सने थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून आपबीती सांगितली आहे.
हॉस्पिटलचा अधीक्षक डॉक्टर दीपक मरावी यांच्यावर अश्लिलतेचा तसेच लैंगिक शोषनाचा आरोप लावला आहे. मरावी डॉक्टर या नर्सना सुटी हवी असल्यास किंवा जॉयनिंगच्या वेळी आपल्या केबिनमध्ये बोलवून घेत होते. यावेळी या नर्सना अश्लिल पद्धतीने स्पर्श करणे आणि अश्लिल बोलणे आदी चाळे करायचे, असा आरोप या नर्सनी केला आहे.
याचबरोबर कामावरून देखील या नर्सना निरीक्षणाच्या वेळी विनाकारण ठपका ठेवून आपल्या चेंबरमध्ये बोलवत असतो. रात्रीच्या वेळी हाप पँटवर दारुच्या नशेत नर्ससाठीच्या चेंजिंग रुममध्ये येऊन अश्लिल बोलतात, असा आरोप या पत्रात करणार आला आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांबरोबच गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आरोग्य मंत्री विश्वास सारंग आणि डीजीपी सुधीर सक्सेना यांना देखील पत्र पाठविले आहे.
त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, मरावी यांनी त्यांच्या चेंबरमध्ये एका नर्सवर बलात्काराचा देखील प्रयत्न केला आहे. तिचे नुकतेच लग्न झाले होते, यामुळे तिचे आम्ही यात नाव घेतलेले नाही. जर योग्य चौकशी सुरु झाल्यास आम्ही आणि ती पीडिता सर्व आपल्या तक्रारी लिखितमध्ये देण्यास तयार आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे.
यावर मंत्री विश्वास सारंग यांनी आपल्याला पत्र मिळाले असून भोपाळच्या विभागिय आयुक्तांना १० दिवसांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. यावर काँग्रेसने म्हटले आहे की, ५० नर्स या काय खोटे बोलत आहेत का? 10 दिवसांची चौकशीचा फार्स कशासाठी, हे मामाजींचे सरकार आहे यामुळेच असे होत आहे, असा आरोप केला आहे.