शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

मृत महिलेच्या नावावर लाटले ५८ लाख; भूमाफियांना सरकारलाच गंडवलं 

By नितीन पंडित | Published: November 09, 2022 6:16 PM

भिवंडीत मुंबई वडोदरा महामार्गातील आणखी एक घोटाळा श्रमजीवी संघटनेने केला उघड

भिवंडी - मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागी बनावट शेतकरी उभे करून सुमारे १२ कोटी रुपये लाटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एका वयोवृद्ध मयत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला बनावट महिला उपविभागीय अधिकारी कार्यालयात उभी करून तब्बल ५८ लाखांचा मलिदा लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाधित आदिवासी महिला ही २०११ मध्येच मयत असून तिच्या जागी ज्या आदिवासी महिलेला पैसे घेण्यासाठी उभं केलं होतं. 

तिच्या नावे भिवंडी उपविभागीय कार्यालयाने सुमारे ३२ लाख रुपये परत करण्याची नोटीस बजावल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे भिवंडी तालुक्यातील दुगाड येथील मयत ठकी सख्या सवर या महिलेची मौजे दुगाड येथील शेतजमीन सर्व्हे क्रमांक १२०/३ /५ तसेच १२०/३ अ असे मिळून एकूण ३०००  चौरस मीटर क्षेत्र बाधित होत असल्याचे शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाले .परंतु ठकी सवर ही आदिवासी वृद्ध महिला २० एप्रिल २०११ मध्येच मयत झालेली दुगाड ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे.असे असतानाही काही भुमाफियांनी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात २ मे २०१८ रोजी या मयत महिलेच्या जागी भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस उभे करून तीच ठकी सवर असल्याचे भासवून मोबदला मिळणे कामी प्रकरण सादर केले.त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ६ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकरण मंजूर करून ठकी सवर हिच्या नावे प्रत्येकी दोन्ही प्लॉट मिळून ६४ लाख ९२ हजार २१८ रुपये मंजूर करून त्यापैकी १० टक्के रक्कम कपात करून मयत ठकी सवर हिच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात ५८ लाख ४२ हजार ९९६ जमा करण्यात आले.

या प्रकरणात भूमाफियांनी मयत ठकी या महिलेच्या जागी गावातील भागीरथी मुकणे या वयोवृद्ध महिलेस प्रांत कार्यालयात उभे करून ठकी च्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आले तर भागीरथी या महिलेच्या फोटोचा वापर करून प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे बनवली.या जमिनीचा मोबदला दिल्या नंतर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या तपासणीत सदर सर्व्हे क्रमांक १२०/३/५ हा दुबार नोंदविला गेला असल्याने रद्द करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २९ ऑगष्ट २०२२ रोजी मयत ठकी सवर हिच्या नावे नोटीस बजावून दिले गेलेले ३२ लाख ४६ हजार १०९ रुपये शासनास परत करण्या बाबत नोटीस बजावली .सदरची नोटीस भागीरथी मुकणे हिचा नातू किरण सुनील मुकणे या नातवाच्या हाती पडली .आपली जमीन नसून आपण पैसे घेतलेले नसताना आपल्याला नोटीस का म्हणून भयभीत झालेल्या किरणने गावातील श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक जिल्हा प्रमुख जयेंद्र गावित यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी या बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाढपुरावा घेतला असता हा बनाव उघडकीस आला आहे.

या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्याने संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली असून बनावट व्यक्तीस उभी करीत असताना आदिवासी अज्ञानी महिलेचा आधार घेऊन शासकीय रक्कमेचा अपहार केला असून संबंधितांना नोटीस बजावल्या असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी बुधवारी दिली आहे .