बंगळुरू एका महिलेवर अत्याचार आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली येथे सहा अवैध बांगलादेशींनाअटक करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. बंगळुरू पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “व्हिडिओ क्लिपच्या आधारे बंगळुरू शहर पोलिसांनी एका महिलेसह पाच आरोपींचा त्वरित शोध घेतला आणि त्यांना अटक केली. व्हिडिओमध्ये हे लोक महिलेवर अत्याचार आणि त्रास देताना दिसत आहेत.'सध्या पीडित मुलगी शेजारील राज्यातील असून पोलिस पथक तिला शोधण्यासाठी गेला आहे. जेणेकरून तिचा तपासात समावेश होऊ शकेल. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपी बांगलादेशातील असून ही घटना आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडली आहे. या प्रकरणात आरोपींपैकी २ महिला आहेत.व्हिडिओमध्ये एक महिला आरोपीला त्रास देताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिलेच्या खासगी भागात बाटली घालताना देखील दिसत आहे. यानंतर २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना सुमारे सहा दिवसांपूर्वी सांगितली जात आहे. या संदर्भात बंगळुरू पोलिसांनी सांगितले की,'आरोपी व्यक्तींच्या चौकशीदरम्यान व्हिडीओ क्लिप व समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे आरोपींविरूद्ध बलात्कार, प्राणघातक हल्ल्याचे कलम आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, 'आतापर्यंत उघडकीस आलेल्या माहितीनुसार ते सर्व एकाच गटातील आहेत आणि ते बांगलादेशचे आहेत. पैशांच्या वादातून आरोपींनी पीडितेला मारहाण केली.
बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या दुसर्या राज्यात आहे आणि तिला आणण्यासाठी एक टीम पाठविण्यात आली आहे. तो परत आल्यानंतर त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवले जाईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर ही महिला ईशान्येकडील असल्याचे उघडकीस आलं आहे. याबाबत आसाम पोलिसांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
सेक्ससाठी १५ दिवसांपासून पत्नी देत होती नकार; पतीने उचलले धक्कादायक पाऊल
या संदर्भात आसाम पोलिसांनी एक ट्विट केले. ट्विटद्वारे 'ही छायाचित्रे ५ दोषींची आहेत. जी एका व्हायरल व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर निर्दयपणे छळ करत असल्याचं दिसत आहेत. या घटनेची वेळ किंवा ठिकाण स्पष्ट नाही. ज्या कोणाला त्यांच्याबद्दल माहिती असेल त्याने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.