जळगाव : गोपनीय असलेल्या पासवर्डचा गैरवापर व एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली छेडछाड करुन कॅश स्लॉट कॅसेटसह ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.
एटीएमचे काम पाहणाºया व्ववस्थापकाच्या तक्रारीवरुन कंपनीचे कस्टोडीयन दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहूल संजय पाटील (रा.खडके बु.ता.एरंडोल ) व मुकेश विलास शिंदे (रा.समता नगर) या तिघांविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.