शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

दाबोळी विमानतळावर महिला प्रवाशाकडून ६ लाखांचे तस्करीचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 7:36 PM

ह्या महीन्यात तीन वेगवेगळ््या कारवाईत कस्टम अधिकाऱ्यांनी ३४ लाख १५ हजार रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त

ठळक मुद्देबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली असून ह्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.मार्च महीन्याच्या सुरवातीपासून अजून कस्टम अधिकाऱ्यांनी दाबोळी विमानतळावर तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ कीलो ३०० ग्राम वजनाचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये आहेत.

वास्को - आज (दि.२०) सारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबीया’ विमानातील एक महीला प्रवाशी संशयास्पद वागत असल्याचे आढळताच कस्टम अधिकाऱ्यांनी तीची झडती घेतली असता तिच्याकडून लपवून आणलेले ६ लाख ८६ हजार ८८२ रुपयांचे तस्करीचे सोने सापडले. मार्च महीन्याच्या सुरवातीपासून अजून कस्टम अधिकाऱ्यांनी दाबोळी विमानतळावर तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ कीलो ३०० ग्राम वजनाचे सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये आहेत.बुधवारी (दि.२०) दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे सारजाहून आलेले विमान उतरल्यानंतर येथे प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना कस्टम अधिकाऱ्यांना एका महीला प्रवाशावर संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी तिला बाजूला घेऊन तिची तपासणी करण्यास सुरू केली असता तिने अंगावर परिदान केलेल्या बुरख्यात चार सोन्याच्या बांगड्या लपवून आणल्याचे स्पष्ट झाले. सदर सोन्याच्या बांगड्या कायदेशीर रित्या आणल्या आहेत काय याची चौकशी केली असता ह्या सोन्याच्या बांगड्या तस्करीने आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या कस्टम कायद्या खाली जप्त करण्यात आल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या चारही सोन्याच्या बांगड्या २३२ ग्राम वजनाच्या असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन याची एकूण रक्कम ६ लाख ८६ हजार ८८२ रुपये असल्याचे सांगितले. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक कमिश्नर एन.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आलेली असून ह्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.दरम्यान ह्या महीन्याच्या सुरवातीपासून अजून पर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ््या तस्करी प्रकरणात एकूण १ किलो ३०० ग्राम सोने जप्त केले असून याची एकूण रक्कम ३४ लाख १५ हजार ४४ रुपये असल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. ह्या महीन्याचे पहीले तस्करीचे प्रकरण ६ मार्चला पकडण्यात आले असून यात कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर एका प्रवाशाकडून ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणलेले ५९० ग्राम तस्करीचे सोने पकडले होते. ह्या तस्करी सोन्याची एकूण रक्कम १८ लाख ९ हजार ६८४ रुपये असल्याची माहीती यावेळी उघड करण्यात आली होती. १० मार्चला अन्य एका कारवाईत कस्टम अधिकाºयांनी एका प्रवाशाकडून पुन्हा एकदा ‘पेस्ट’ पद्धतीने लपवून आणलेले ४७८ ग्राम तस्करीचे सोने जप्त केले होते. याची किंमत ९ लाख १८ हजार ४७८ रुपये असून आज (दि.२०) करण्यात आलेली ह्या महिन्याची ही तिसरी कारवाई होती. ह्या तीनही प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.एप्रिल २०१८ ते अजून पर्यंत दाबोळी विमानतळावर २ कोटी ७० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्तदाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाºयांनी ह्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत) अजून पर्यंत विविध तस्करीच्या प्रकरणात कारवाई करून विविध प्रवाशांकडून अजून एकूण २ कोटी ७० लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. तसेच कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर विविध प्रवाशांकडून बेकायदेशीर रित्या नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेली ७५ लाख १४ हजार रुपयांची विदेशी चलने सुद्धा जप्त केली आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे ११ दिवस राहीले असून दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकाºयांकडून आणखीन केवढ्या कारवाई करण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळPoliceपोलिसArrestअटकGoldसोनं