नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडे राज्यातील नारायणपूर येथे ६२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. बस्तरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि नारायणपूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण करण्याआधी नक्षलवाद्यांनी ५१ देशी शस्त्रास्त्रे पोलिसांकडे सोपवले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीअगोदर पोलिसांना मिळालेले हे यश म्हणता येईल.
पोलीस उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी आरनपूर येथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात आमचे दोन जवान शहीद झाले. तर हल्ल्यात जखमी झालेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाले होते अशी माहिती दिली.
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू; दोन जवान शहीद