पुणे : जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गीता विशाल पवार (वय ३२, रा. सहाय्यक वनसंरक्षक वर्ग-१) असे लाच घेताना पकडलेल्या महिला अधिकाºयाचे नाव आहे. औंध येथील वेस्टर्न मॉल येथे सापळा रचून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून, त्यांना पाटबंधारे विभागाचे पाईपलाईन टाकण्याचे कंत्राट मिळालेले आहे. सदर काम चालू असताना टाकलेली पाईपलाईन ही वनखात्याच्या जमिनीमध्ये असल्याने ठेकेदारांवर वनखात्यांतर्गत कारवाई केली होती. तसेच, त्यांचे साहित्य आणि ट्रक्टर जप्त केले होते. जप्त केलेल्या वस्तू सोडविण्यासाठी पवार यांनी त्यांच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणाऱ्या पवार यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीचे पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय भापकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सापळा लावला. वेस्टर्न मॉल परिसरात तक्रारदार ठेकेदाराकडून तडजोडीअंती ६५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पवार यांना रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे करीत आहेत.
सहायक वनसंरक्षक महिला अधिकाऱ्याने घेतली ६५ हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:13 PM
जप्त केलेले साहित्य आणि ट्रॅक्टर सोडविण्यासाठी ठेकेदाराकडून ६५ हजारांची लाच घेताना सहायक वनसंरक्षक महिला अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल