शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

युनियन बँकेला कंपनीने घातला ६८ कोटींचा गंडा; भद्रेश ॲग्रोवर गुन्हा, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 6:58 AM

कापूस ते कापड अशा व्यापारात असलेल्या या कंपनीने २०१६ साली युनियन बँकेकडून ७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कर्जप्राप्त रकमेचा अपहार करत युनियन बँकेची ६८ कोटी ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित भद्रेश ॲग्रो या कंपनी विरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक भद्रेश मेहता, पार्थ मेहता, हिना मेहता यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. 

कापूस ते कापड अशा व्यापारात असलेल्या या कंपनीने २०१६ साली युनियन बँकेकडून ७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीच्या कामकाजाचा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी प्रामुख्याने हे कर्ज कंपनीने घेतले होते. प्रत्यक्षात कंपनीच्या संचालकांनी या कर्जाची परतफेड केली नाही व हे पैसे हेतुपुरस्सर वैयक्तिक नावे हडप केल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणी घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेने कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट केले. या माध्यमातून देखील कंपनीने मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे उद्योग केल्याचे निदर्शनास आले. कंपनीचे खाते २०१७ मध्ये थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले तर २०१८ साली भारतीय रिझर्व्ह बँकेने हे खाते ‘फ्रॉड खाते’ म्हणून घोषित केले आहे.

कर्ज रकमेची हेराफेरीकंपनीला कर्जापोटी जे पैसे मिळाले ते पैसे कंपनीच्या संचालकांनी आपल्याच परिघातील कंपन्यांत फिरवून नंतर ते पुन्हा आपल्याकडे वळविल्याचे तपासात दिसून आले. कंपनीच्या मालाची मोठ्या प्रमाणावर आवक-जावक केल्याचा जरी दावा कंपनी करत असली तरी त्याच्या कोणत्याही व्यवहाराची कोणतीही नोंद ठेवली नाही. तसेच जो माल व्यवहारासाठी पाठवला होता तो परवाना प्राप्त मालवाहू वाहनातून देखील पाठवला नाही. या माल वाहकाच्या बनावट पावत्यादेखील कंपनीने सादर केल्याचे फोरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून आले. 

टॅग्स :fraudधोकेबाजी