शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

काळीज हादरवणारी घटना! ७ महिन्याच्या चिमुरड्यावर तलवारीनं वार करून निर्दयी हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 11:33 AM

तलवारीचा वार माहिरच्या डोक्यावर लागला होता. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता.

मुजफ्फरपूर - द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसमामानं क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. कंसनं ८ बालकांची निर्दयी हत्या केली. कलियुगात बिहारच्या मुजफ्फरपूर इथं अशाच क्रूरतेचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं ७ महिन्याच्या बाळाची तलवारीनं वार करून हत्या केली आहे. बुधवारी रात्री १० च्या सुमारास भाजीविक्रेता राजा पटेल उर्फ छोटू त्याच्या ७ महिन्याच्या चिमुरड्यावर काही टोळक्यांनी त्याच्यावर हल्ला केला. 

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याला हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे. मात्र या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचली. या बाळाचं नाव माहिर होतं. छोटूने सांगितले की, माहिरची तब्येत बिघडली होती परंतु डॉक्टरांना दाखवण्यासाठी पत्नीसह हॉस्पिटलला जात होता. मात्र कटही पूलावर पोहचल्यावर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या ५-६ लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. जोपर्यंत छोटू आणि त्याची पत्नीला काही कळतं तोवर हल्लेखोरांनी ७ महिन्याच्या माहिरवर हल्ला केला होता. 

तलवारीचा वार माहिरच्या डोक्यावर लागला होता. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. आईवडिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहचले त्यांना पाहून हल्लेखोर पसार झाले. या जखमी अवस्थेत मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. कटही पूल येथे महिलांनी आरोप लावला की, ट्रेन येण्यापूर्वी ५ मिनिटं हल्लेखोर युवक तलवार घेऊन याठिकाणी फेऱ्या मारत होता. परंतु त्याला कुणी पकडलं नाही. जीआरपीनंही रक्ताने माखलेले तलवारीकडे लक्ष दिले नाही. 

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक बनवलं

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मृत बाळाचे नातेवाईक तिथे पोहचले. मुलाच्या मृत्यूनंतर आईला मोठा धक्का बसला. ७ महिन्याचा बाळ आता तिच्यासोबत नसल्याची कल्पनाही तिने केली नसेल. त्याठिकाणी असलेल्या महिलांनी बाळाच्या आईला सावरण्याचा प्रयत्न केला. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तैनात केले आहेत.