गोंदिया: उपविभागीय अधिकारी गोंदिया आणि देवरी यांच्या आदेशान्वये गोंदिया जिल्ह्यातील आणखी सात अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. यात गोंदिया शहर हद्दीतील तीन, गंगाझरी दोन, रामनगर व सालेकसा प्रत्येकी एक अश्या सात अट्टल गुन्हेगारांना गोंदिया जिल्हा हद्दीतून तीन महिन्याकरिता हद्दपार केले आहे. गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दितील कोमल रमेश बनकर (३०) रा. चावडी चौक छोटा गोंदिया याचेवर विविध पोलीस ठाण्यात २० गुन्ह्याची नोंद आहे.
जय सुनील करीयार (४६) रा. हनुमान मंदीर समोर, दसखोली गोंदिया याच्या विविध पोलीस ठाण्यात ३१ गुन्हयाची नोंद आहे. प्रमोद हिरामण गजभिये (५०) रा. लक्ष्मीनगर, गोंदिया याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १७ गुन्हयाची नोंद आहे. गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार राकेश रामदास मडावी (३५) रा. गंगाझरी, गोंदिया याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ८ गुन्हयाची नोंद, योगराज भाऊलाल माहूरे (४७) रा. कोहका ता. जि. गोंदिया याच्यावर विविध ८ गुन्ह्याची नोंद आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार राहुल दिनेशसिंह बरेले (२०) रा. कॉलेजटोली कुडवा गोंदिया याच्यावर विविध ठाण्यात ९ गुन्ह्याची नोंद आहे.
सालेकसा ठाण्याच्या हद्दीतील अजयकुमार रघुवीरप्रसाद अग्रवाल (५३) रा. साखरीटोला सालेकसा याच्यावर ६ गुन्ह्यांची नोंद आहे. कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, रोहिणी बानकर, प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे, भुषण बुराडे, सुधीर वर्मा यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधक सेलद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे.
सहा आरोपींना तीन जिल्ह्यातून केले तडीपारया सात पैकी सहा आरोपींना गोंदिया, भंडारा, बालाघाट जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तीन महिण्याकरीता हद्दपार करण्यात आले. तर अजयकुमार अग्रवाल याला देवरी उपविभाग अंतर्गत तालुका देवरी, आमगाव , सालेकसा हद्दीतून ती महिण्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.
गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी तडीपारची कारवाईनवरात्रोत्सव व होणारी विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अट्टल सराईत गुन्हेगार यांच्याविरूध्द विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधीत राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारी प्रवृत्तीना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा म्हणुन ठाणेदार गोंदिया शहर, रामनगर, गंगाझरी, सालेकसा यांनी नमूद अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) (अ)(ब) अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. उपविभागीय दंडाधिकारी चंद्रभान खंडाईत, देवरीच्या उपविभागीय दंडाधिकारी कविता गायकवाड यांनी नमूद सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे आदेश काढून- तीन महिन्यांच्या कालावधी करिता गोंदिया जिल्हा बाहेर हद्दपार केले आहे.
सन्मानाच्या रोजगाराकडे वळाजिल्ह्यातील अट्टल सराईत गुन्हेगारांना ते करीत असलेल्या अवैध कृत्यापासून व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन आपल्या चारित्र्य सुधारून इतर चांगले, वैध रोजगाराकडे वळावे. अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील.- गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया.