नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात शूटर्सना अटक केली आहे. सर्व शूटर्सना पंजाब आणि आसपासच्या राज्यांतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शूटर्सचीही विशेष सेल चौकशी करत आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीवर कारवाईमिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईत आता सात शूटर्सला अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षीसदरम्यान, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 2022 मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तीन संशयित हल्लेखोरांनी हत्येपूर्वी तुरुंगात कॅनडात लपून बसलेला लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी संवाद साधला होता.
बाबा सिद्दिकींची मुंबईत हत्या 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले. याप्रकरणी बुधवारी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. रुपेश राजेंद्र मोहोळ (22), करण राहुल साळवे (19) आणि शिवम अरविंद कोहर (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.